esakal | ऑक्‍सिजनविना फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योग बंदच्या मार्गावर; या जिल्ह्यातील स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Foundry-engineering industry on the verge of closure without oxygen

सांगलीतील औद्योगिक क्षेत्रातील फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योगांना ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नसल्याने ते बंदच्या मार्गावर आहेत.

ऑक्‍सिजनविना फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योग बंदच्या मार्गावर; या जिल्ह्यातील स्थिती

sakal_logo
By
ऋषिकेश माने

कुपवाड : औद्योगिक क्षेत्रातील फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योगांना ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नसल्याने ते बंदच्या मार्गावर आहेत. 
सांगली,मिरज,कुपवाड बामणोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या सुमारे हजार ते अकराशेच्या आसपास आहे. यामध्ये वस्त्रोद्योग, फौंड्री,इंजिनिअरिंग, प्लास्टिक, कॅटलफिल्ड,केमिकल्स,औषध कंपनी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आशा उद्योगांनी आपल्या विस्तारात वाढ केली आहे. 'कोरोना' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशानाने पुकारलेल्या लॉकडाउन काळात औद्योगिक क्षेत्रातील उद्योग दीड-दोन महिने बंद होते. कालांतराने थोड्या-थोड्या प्रमाणात ते सुरू करण्यात आले.

\सुरवातीची जिल्हाबंदीसह कामगारांच्या भासणाऱ्या टंचाईमुळे असंख्य उद्योगांचे कंबरडे मोडले. मोठा आर्थिक फटका बसला. हा फटका सहन करत काही उद्योगाचे चक्र संथ गतीने चालू लागले. सध्या मात्र ऑक्‍सिजनचा पुरवठा खंडित असल्याने फौंड्री-इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योगांवर मंदीची कुराड कोसळली आहे. गॅस कटिंग,वेल्डिंग यासाठी लागणाऱ्या ऑक्‍सिजनचा पुरवठाच होत नसल्याने हे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 

याबाबत बोलताना इंडस्ट्रीज असोसिएशन बामणोलीचे चेअरमन अनंत चिमड म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात सुमारे चारशे ते साडेचारशे इंजिनिअरिंग उद्योग आहेत. 'कोरोना' संसर्गजन्य रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने राज्यासह जिल्ह्यातील बऱ्यापैकी ऑक्‍सिजन प्लांट ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योगांना ऑक्‍सिजनची टंचाई जाणवू लागली.ऑक्‍सीजन वापरून होणाऱ्या गॅस कटिंग,वेल्डिंगला असणारा प्लाज्मा कटिंग हा पर्याय नुकसानकारक आणि महागडा आहे.त्याचा दर ऑक्‍सिजनच्या तुलनेत कित्येक पटीने चढता असल्याने तो छोट्या उद्योजकांना परवडणारा नाही. आशाने फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 

उद्योग ऑक्‍सिजन सिलेंडर शिवाय चालणे कठीण
फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योग ऑक्‍सिजन सिलेंडर शिवाय चालणे कठीण आहे. तो उपलब्ध नसल्याने औद्योगिक क्षेत्रासह साईटवर चालणाऱ्या कामांमध्ये अडचण निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास उद्योग बंद करावा लागेल. शासनाने तातडीने ऑक्‍सिजनचा पुरवठा आपल्या माध्यमातून करून घ्यावा. 
- अमित चिंचवाडे, उद्योजक (कुपवाड) 


शेती व्यवसायावर परिणाम. 

पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकामध्ये साखर कारखान्यांची सांख्या जास्त आहे. त्यांना उपयुक्त मशिनरी-स्पेअर्स पार्ट उपलब्ध करून देण्याचे कार्य फौंड्री-इंजिनिअरिंग आशा उद्योगातुन होते. ऑक्‍सिजनच्या तुटवड्यामुळे निर्यातीवर ऐशी टक्के घटली आहे. शेती व्यवसायावर याचा परिणाम निर्माण होऊ शकतो. 

संपादन : युवराज यादव