कृष्णेत बुडालेल्या 'त्या' चार भावांपैकी एकाचा मृतदेह सापडला

अन्य तिघांचा शोध सुरू ; पथकांचा नदीच्या काठावर तळ
कृष्णेत बुडालेल्या 'त्या' चार भावांपैकी एकाचा मृतदेह सापडला

अथणी : तालुक्यातील हल्याळ (hallyal) येथील चार सख्खे भाऊ सोमवारी (२८) कृष्णा नदीत (krishna river) बुडाले होते. अखेर मंगळवारी (२९) त्यातील एका भावाचा मृतदेह सापडला आहे. अन्य तिघांचा शोध सुरु आहे. शोध मोहिमेतील एनडीआरएफ, (NDRF) कोबा पथक, पोलिस, अग्निशामक दल व पोहोण्यात तरबेज असलेल्या पथकांचा नदीच्या काठावरच तळ आहे. परशराम गोपाळ बनसोडे (वय 36) असे मृतदेह सापडलेल्या भावाचे नाव आहे. (crimenews) अन्य तिघांचे काय झाले, याची काळजी कुटुंबीयांना लागली आहे.

हल्याळ गावातील पिराचा उरुस असल्याने धुणे धुण्यासाठी गेलेले चार भाऊ कृष्णा नदीत बुडाले आहेत. सदाशिव गोपाळ बनसोडे (वय 24), परशराम गोपाळ बनसोडे (वय 36), दरयाप्पा गोपाळ बनसोडे (वय 22) व शंकर गोपाळ बनसोडे (वय 18) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारपासूनच एनडीआरएफ पथक, अग्निशामत दल, पोलिस व पोहोण्यात तरबेज असलेल्या मंडळींच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे. सोमवारी उशिर झाल्याने रात्री शोधकार्य थांबविले होते. मंगळवारी (२९) सकाळी बुडालेल्या चार भावांच्या शोधासाठी पथके सज्ज झाली. त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रात शोध घेण्यास प्रारंभ केला.

कृष्णेत बुडालेल्या 'त्या' चार भावांपैकी एकाचा मृतदेह सापडला
निवडणुकीच्या वाऱ्यांनी सेनेतील नाराजी उघड

कोल्हापूरहून विशेष 'कोबा' पथकाला शोध मोहिमेसासाठी पाचारण केले आहे. एनडीआरएफ व कोबा पथक पाण्यात शोध घेत आहेत. घटनास्थळी चिक्कोडीचे प्रांताधिकारी युकेशकुमार यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. घटनास्थळावर तालुका पंचायत अधिकारी रवी बंगारप्पा, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, उपनिरीक्षक कुमार हाडकर आहेत. या घटनेमुळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.

आजही शोधकार्य सुरूच

कृष्णानदी तुडूंब भरल्याने शोधकार्यात व्यत्यय येत आहे. मात्र शोधकार्य सुरुच ठेवले आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत एका भावाचा मृतदेह सापडला आहे. आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे. बुधवारी (३०) आणखी तिघांचा शोध घेण्यात येणार आहे. परिसरातील मच्छीमार करणारे या तपास कार्यात सहभागी झाले आहेत. औरवाड, सप्तसागर, दरुर, हल्याळ, शेगुणशी, हुलगबाजी परिसरातील नागरिक नदीकाठावर गर्दी करत आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तपास कार्यात अडथळे येत आहेत.

कृष्णेत बुडालेल्या 'त्या' चार भावांपैकी एकाचा मृतदेह सापडला
गड किल्ल्यांवर जाणाऱ्यांना संभाजीराजेंनी केलं आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com