esakal | गुजरातमध्ये अपघातात नगरचे चार भाविक ठार

बोलून बातमी शोधा

 Four killed in Gujarat accident

अधिक माहिती अशी : गुजरातमधील कुबेर भांडार मंदिराच्या दर्शनासाठी पिंप्री निर्मळ येथील भाविक कारने (एमएच 17 एझेड 457) काल (शनिवारी) गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना, आज सकाळी सहाच्या सुमारास तेथील राजपिपला घाटात भरधाव ट्रकची कारला समोरून जोरात धडक बसली.

गुजरातमध्ये अपघातात नगरचे चार भाविक ठार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहाता : गुजरातमधील राजपिपला घाटात ट्रक व कार यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये राहाता तालुक्‍यातील तिघांचा, तर वैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. 

गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय 63), नंदकिशोर संपत निर्मळ (वय 26, दोघेही रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता), प्रवीण सारंगधर शिरसाठ (वय 46, रा. कोल्हार, ता. राहाता) व किशोर राजाराम कोल्हे (वय 49, रा. नांदगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : गुजरातमधील कुबेर भांडार मंदिराच्या दर्शनासाठी पिंप्री निर्मळ येथील भाविक कारने (एमएच 17 एझेड 457) काल (शनिवारी) गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना, आज सकाळी सहाच्या सुमारास तेथील राजपिपला घाटात भरधाव ट्रकची कारला समोरून जोरात धडक बसली.

त्यात कारमधील वरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृत किशोर कोल्हे व नंदकिशोर निर्मळ एकमेकांचे मेव्हणे होते. गुजरातमधील नर्मदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजपिपला येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आले. या दुर्घटनेमुळे राहाता तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे.