
मिरज (सांगली) ः शहरातील आकाश इलेक्ट्रॉनिक्स या टीव्ही शोरूमच्या गोदामातून चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांचे एलईडी लंपास केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
मिरज (सांगली) ः शहरातील आकाश इलेक्ट्रॉनिक्स या टीव्ही शोरूमच्या गोदामातून चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांचे एलईडी लंपास केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरात मार्केट परिसरात आकाश इलेक्ट्रॉनिक्स हे टीव्हीचे मोठे शोरूम आहे. त्याचे गोदाम बस स्थानक रस्त्यावरील एपी बेकरीच्या पिछाडीस आहे. शोरूममधील टीव्हीचा हिशेब लागत नसल्याने कर्मचाऱ्यांना घेऊन शोरूमचे मालक सुरज मनोहर पंजवानी हे गोदामात गेले. गोदामाच्या छताचे पत्रे नट बोल्ट काढून उचकटल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी गोदामाची पाहणी केली. चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून गोदामात प्रवेश केल्याचे आणि तेथूनच मोठ्या कंपन्यांचे तब्बल 22 एलईडी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. हे 22 एलईडी नेण्यासाठी चोरट्यांनी एखाद्या मोठ्या वाहनाचा वापर केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
चोरट्याने गोदामात प्रवेश केल्यानंतर छताच्या पत्र्याचे नट बोल्ट उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सीसीटीव्ही बंद केला आणि एलईडीवर हात मारला. चोरून नेलेल्या एलईडीत ओनिडा, सॅमसंग, एज या कंपनीच्या 32 ,42 आणि 43 इंचाच्या एल ई डींचा समावेश आहे.
संपादन ः अमोल गुरव