
Sangli Family Crime News : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात सासू-सुनेचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. बाप-लेकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गावापासून जवळच असणाऱ्या पाटील वस्तीवर घडलेल्या या घटनेविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. कर्जबाजारीपणामुळे भानामतीच्या फेऱ्यात अडकल्याचा संशय तपासात समोर येतोय. या कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले, याचा सखोल तपास पोलिस यंत्रणेने सुरू केला आहे.