चार हजार रुग्णांचा टप्पा पार ! सोलापुरातील 'या' नगरांमध्ये सापडले 64 पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Wednesday, 22 July 2020

ठळक बाबी... 

 • आतापर्यंत शहरातील 21 हजार 529 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • शहरात आतापर्यंत सापडले चार हजार 52 कोरोना पॉझिटिव्ह 
 • मंगळवारी शहरात सापडले 64 पॉझिटिव्ह; चौघांचा झाला मृत्यू 
 • आतापर्यंत मृतांची संख्या 333; दोन हजार 242 रुग्णांची कोरोनावर मात 
 • होम क्‍वारंटाईनमध्ये साडेअकराशे तर संस्थात्मक विलगीकरणात सुमारे एक हजार संशयित 
 • माफणे अर्पाटमेंटमध्ये सहा, मल्लिकार्जुन नगरात चार, मंजुषा सोसायटीत दहा, गणेश नगरात (बाळे) सापडले सात रुग्ण 

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी (ता. 21) घेतलेल्या एक हजार दोन टेस्टमध्ये 64 व्यक्‍तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तो अहवाल बुधवारी (ता. 22) महापालिकेकडून देण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक चार, पाच, सात, आठ, नऊ, 13, 15, 16, 18, 21, 24 आणि 26 या प्रभागांमध्ये रुग्णसंख्या दीडशेहून अधिक झाली आहे. शहरातील रुगणसंख्या आता चार हजार 52 झाली असून मृतांची संख्या 333 झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी दोन हजार 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एक हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मृत्यूची संख्या कमी होईल ही अपेक्षा अद्यापही फोल ठरली आहे. 

होटगी रोडवरील अंबिका नगरात दोन, देगाव, स्वागत नगर, सिध्देश्‍वर नगर (नई जिंदगी), प्रेम नगर (जुळे सोलापूर), रेल्वे लाईन, शुक्रवार पेठ, भवानी पेठ, गांधी नगर (दक्षिण सदर बझार), देशमुख गल्ली (नवी पेठ), पापाराम नगर (विजयपूर रोड), एसआरपी कॅम्प, कुमठा नाका, मुमताज नगर, शुक्रवार पेठ, लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), आदित्य नगर, लिमयेवाडी, सिध्देश्‍वर पेठ, एकता नगर, भारतरत्न इंदिरा नगर, बालाजी सोसायटी (कुमठा नाका), काडादी नगर (होटगी रोड) याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच सलगर वस्ती दोन, मल्लिकार्जुन नगरात चार, शेळगीतील माफणे अपार्टमेंटमध्ये सहा, शेळगी व भवानी पेठेत प्रत्येकी दोन, मंजुषा सोसायटीत (विकास नगर) सर्वाधिक दहा रुग्ण आढळले आहेत. तर गुलमोहर सोसायटी (वसंत विहार), बुधले गल्ली, स्वामी विवेकानंद नगर येथे प्रत्येकी दोन रुग्ण आणि गणेश नगरात (बाळे) येथे सात रुग्ण सापडले आहेत.

ठळक बाबी... 

 • आतापर्यंत शहरातील 21 हजार 529 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • शहरात आतापर्यंत सापडले चार हजार 52 कोरोना पॉझिटिव्ह 
 • मंगळवारी शहरात सापडले 64 पॉझिटिव्ह; चौघांचा झाला मृत्यू 
 • आतापर्यंत मृतांची संख्या 333; दोन हजार 242 रुग्णांची कोरोनावर मात 
 • होम क्‍वारंटाईनमध्ये साडेअकराशे तर संस्थात्मक विलगीकरणात सुमारे एक हजार संशयित 
 • माफणे अर्पाटमेंटमध्ये सहा, मल्लिकार्जुन नगरात चार, मंजुषा सोसायटीत दहा, गणेश नगरात (बाळे) सापडले सात रुग्ण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thousand patients crossed the stage today 64 positives in Solapur and Death of four