
भावंडात संपत्तीच्या मालकी हक्कावरून वाद आहे.
बेळगाव : संपत्ती वादातून चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प गावात आज घडली. मारुती सुरेश संकण्णावर असे मृत बालकाचे नाव आहे. इराप्पा बसप्पा संकण्णावर (वय 35, हारुगोप्प) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत प्राथमिक उपलब्ध माहितीनुसार मालमत्ता वादातून हत्या झाल्याचे मानले जात आहे. भावंडात संपत्तीच्या मालकी हक्कावरून वाद आहे.
वादातून मोठ्या भावाच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. चार वर्षीय बालकाची निर्घृण हत्या घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी मुरगोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून ते पुढील चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार काकांनी हत्या केल्याचे आढळून आल्यानंतर त्यादिशेने चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मालमत्तेच्या वादातून खूनाची घटना घडल्याचे दिसत आहे. पंरतु, खरोखर तेच कारण आहे का? याची शहानिशा केली जात आहे.
हेही वाचा - अद्यापही महाआघाडीला काम करण्याची मोठी संधी आहे
संपादन - स्नेहल कदम