आले होते शिकारीसाठी; गेले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

चंदगड-जांबरे मार्गावर देसाईवाडी नजीक शिकारीच्या उद्देशाने आलेल्या चौदा संशयितांच्या टोळक्‍याला येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हे सर्वजण हलकर्णी (ता. चंदगड) येथील रहिवाशी आहेत. मंगळवारी (ता. 14) रात्री वन विभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली.

चंदगड  - चंदगड-जांबरे मार्गावर देसाईवाडी नजीक शिकारीच्या उद्देशाने आलेल्या चौदा संशयितांच्या टोळक्‍याला येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हे सर्वजण हलकर्णी (ता. चंदगड) येथील रहिवाशी आहेत. मंगळवारी (ता. 14) रात्री वन विभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडे शिकारीसाठीचे साहित्य व शिकारी कुत्री आढळल्यामुळे संशय बळावला असून त्यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी सांगितले. 

हे पण वाचा -  त्या मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात 

तालुक्‍यात संक्रांतीच्या निमित्ताने वन्य प्राण्यांची शिकार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे वन विभागाने खास मोहीम हाती घेतली होती. वन विभागाचे फिरते गस्ती पथक जंगल हद्दीलगत टेहळणी करीत होते. चंदगड- जांबरे मार्गावर देसाईवाडीनजीक संशयित वाहन आढळले. त्यांची चौकशी केली असता वाहनात चौदा संशयित तसेच शिकारीची चौदा कुत्री, भाला, कपाळाला लावल्या जाणाऱ्या बॅटरीज आदी साहित्य आढळले. संशयितांमध्ये अनिल रमेश कांबळे, मसणू विष्णू नाईक, अनिल मारुती आवडण, शिवाजी बसवंत कांबळे, सहदेव आप्पाजी पाटील, आप्पाजी गुंडू हासबे, तानाजी बाबाजी सदावर, विलास मारुती पेडणेकर, विजय वामन सुतार, विठ्ठल पांडुरंग सदावर, रामू बाबू नाईक, निवृत्ती लक्ष्मण नेसरकर, विठ्ठल सोमाणा कांबळे, नारायण आप्पाजी शिवणगेकर या संशयीतांचा समावेश आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

हे पण वाचा - कठीण परिस्थितीतून मिळविलेल्या तिच्या यशाने आईचे डोळे पाणावले

श्री. राक्षे यांच्यासह फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल डी. जी. पाटील, बी. आर. निकम, ए. डी. वाजे, आर. के. देसाई, एस. एस. पोवार, सागर पटकारे, नितीन नाईक, तुकाराम जाधव यांनीही ही कारवाई केली. 

पारंपरिक प्रथा 
- संक्रातीनिमित्त शिकार 
- 14 शिकारी कुत्री 
- शिकारीसाठीचे टोकदार भाले 
- वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourteen people arrested in chandgad kolhapur