वय २६, दाखविले ६२ वर्षे ; अपात्रच बनले लाभार्थी

fraud in belgaum about pension scandals policy 6 person fraud for one year in belgaum
fraud in belgaum about pension scandals policy 6 person fraud for one year in belgaum

बेळगाव : पेन्शन स्कॅंडल अंतर्गत वर्षाने येळ्ळूर परिसरात एकाच कुटुंबात सहा अपात्रांना पेन्शन मंजूर करुन दिली आहे. यात २६ वर्षीय विवाहित महिलेचा समावेश असून तिला ६२ वर्षीय दाखविण्यात आले आहे. विवाहितेसह तिचा पती, सासू, सासरे तसेच घरातील इतर दोन सदस्यही शासनाच्या पेन्शनवर डल्ला मारत आहेत. वर्षाने हा कारनामा करून दाखविला असून तिला याच परिसरातील एका स्वस्त धान्य दुकानातील कामगार युवकाने मदत केली आहे.

राजहंसगड गावासह परिसरातील सुळगे (ये.), देसूर, नंदीहळ्ळी गावात स्वस्त धान्य दुकानात काम करणाऱ्या ‘जादू’गाराने परिसरातील अनेक बनावट लाभार्थींना बीपीएल शिधापत्रिका मंजूर करुन दिली आहे. यासाठी प्रत्येकी ७ हजार रुपये आकारण्यात आले आहेत. या जादूगाराचा संपर्क वर्षाशी आला होता. त्या माध्यमातून या दोघांनी राजहंगडासह परिसरातील अनेक गावांत अपात्रांना पेन्शन मंजूर करुन दिली आहे.

परिसरातील एका कुटुंबाशी सदर जादूगाराचा संपर्क आला. या कुटुंबाला त्याने बीपीएल शिधापत्रिकाही मिळवून दिली आहे. त्याने घरातील सर्वच सदस्यांना ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी पेन्शन मंजूर करुन देण्याची हमी दिली होती. त्यानुसार घरात सहा सदस्य असून प्रत्येकी ३ हजार रुपये पेन्शनसाठी देण्याची कबुली घेण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना पेन्शन लागू झाली आहे. यात १९९४ साली जन्मलेल्या मुलीचाही समावेश आहे. या घरातील प्रत्येक सदस्याच्या आधारकार्ड क्रमांकासह त्यांची नावे सध्या उपलब्ध झाली असून या प्रकरणाचीही चौकशी केली जाणार आहे.

गावातील काही सामाजिक कार्य करणाऱ्यांनीही आता त्याविरोधात आवाज उठविण्याचे ठरविले आहे. शासनाकडून पेन्शनचा लाभ घेणाऱ्या अपात्रांची यादीच तयार करण्यात आली आहे. ही यादी आता भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दिली जाणार असून समितीने बनावट पेन्शनसंदर्भात यापूर्वीच पुरावे जमा करण्यास सुरवात केली आहे. राजहंसगड गावातील अपात्र लाभार्थी, त्यांची जन्मतारीख व आधारकार्ड क्रमांकच समितीकडे दिले जाणार असून त्याची एक प्रत ‘सकाळ‘कडेही उपलब्ध झाली आहे.

त्यात २७ अपात्र लाभार्थींच्या नावाचा समावेश आहे. यासह सुळगे (ये), नंदीहळ्ळी, देसूर परिसरातील यादीही तयार केली जात आहे. या अपात्रांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जावी, अशी मागणीही होत आहे. ज्या कुटुंबांना पेन्शन मंजूर करून देण्यात आली आहे, ते सर्वजण श्रीमंत असून त्यांना बीपीएल शिधापत्रिकाही मिळवून देण्याचा प्रताप याठिकाणी घडला आहे. यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्याचाच समावेश असल्याचे पुढे आले आहे.

कामगारांची वर्षाच लिडर

येळ्ळूर परिसरातील गावांमध्ये ज्या धनिक कुटुंबांना बीपीएल शिधापत्रिका मिळवून देण्यात आल्या आहेत, त्याच घरातील दाम्पत्यांना पेन्शनही मंजूर करुन देण्यात आली आहे. ५० ते ५५ गटातील अनेक दाम्पत्यांना ते ज्येष्ठ नागरीक ठरण्यापूर्वीच बनावट कागदपत्रांच्या आधारे पेन्शन मंजूर करण्यात आली आहे. ही जादूची करामत स्वस्त धान्य दुकानात काम करणाऱ्या काही कामगारांनी केली असून त्यांची लिडर ही वर्षाच आहे. तिनेच या सर्वांना हाताशी धरुन काम केले असून या कामात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा एक अधिकारी सहभागी झाला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com