बेळगाव : जिल्ह्यात मोफत बूस्टर डोस; ७५ दिवसांत २३ लाख डोसचे उद्दिष्ट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून उद्यापासून (ता.१५) परत एकदा मोफत बूस्टर डोसची घोषणा करण्यात आली
Free booster dose from today Belgaum Target of 23 lakh doses in 75 days
Free booster dose from today Belgaum Target of 23 lakh doses in 75 dayssakal

बेळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मोफत बूस्टर डोसची घोषणा करण्यात आली. यानुसार जिल्ह्यात येत्या ७५ दिवसांत सुमारे २३ लाख जणांना बूस्टर डोस देण्याचे उद्दिष्ट असणार आहे. स्वातंत्र्याच्यी ७५ व्या महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ७५ दिवस मोफत बूस्टर डोस अभियान हाती घेतले जात आहे. उद्या (ता.१५) अभियानाला चालना मिळेल. त्यासाठी तयारी सुरु असून, आरोग्य विभागाची आज (ता.१३) बैठक झाली. बैठकीमध्ये पुढील ७५ दिवस बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा झाली. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत लसीकरण केंद्रावर गर्दी दिसयाची. मात्र, आता केंद्र ओस पडली आहेत. आता परत केंद्रे सक्रिय करण्यात आली असून, मनुष्यबळ आणि लशीचा साठा वाढविला जात आहे. ७५ दिवसांत २३ लाख जणांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.

कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्या एक ते दीड वर्षात शंभर टक्के लसीकरण उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. पहिला व दुसरा डोस प्रत्येकाने घेतला आहे. मात्र, बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे. त्याला विविध कारणे आहेत. बूस्टर डोससाठी शुल्क आकारण्यात येत आहे, चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव फारसा नाही व कोरोनाबाबत जनतेच्या मनातून भिती कमी झाली आहे. त्यामुळे बूस्टरकडे पाठ फिरविल्याचे दिसते. तरीही काहींनी शुल्क देऊन बूस्टर डोस घेतला आहे. ६० पेक्षा अधिक वयोगटालाही मोफत बूस्टर डोस देण्यात आला आहे. यामुळे शिल्लक वर्गासाठी बूस्टर डोस मोफत केला आहे.

केंद्रावर मनुष्यबळ वाढविणार

बूस्टर डोस मोफत मिळेल, अशी घोषणा केली आहे. मात्र, अनेकांनी बूस्टर डोस घेतल्याने केंद्रावर त्याचा फारसा ताण जाणविणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सुरवातीचे काही दिवस (दोन ते तीन दिवस) आरोग्य विभागाचे मनुष्यबळ वाढविलेले असेल. यामुळे लसीकरण सुरळीतपणे अभियान चालेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com