बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र दाखवा अन् विनामूल्य प्रवास करा...

Free bus travel for students in bengaluru
Free bus travel for students in bengaluru

बंगळूर - बारावीची वार्षिक परीक्षा ४ मार्च ते २३ मार्च या कालावधीत होणार आहे. परिवहन महामंडळाने दहावीप्रमाणेच आता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निवासस्थानापासून परीक्षा केंद्रापर्यंत राज्य परिवहनच्या बसमधून विनामूल्य प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बसमधून मुक्तपणे प्रवास

सामान्यत: बारावीची परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्येच होत नसून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी इतरत्रही जावे लागते. केएसआरटीसी पासधारकांना शाळेच्या मार्गाशिवाय अन्यत्र प्रवास करण्यास परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवासास परवानगी द्यावी, असे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाने विनामूल्य प्रवासाचे आदेश दिले आहेत. ४  मार्च ते २३ मार्च या कालावधीत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाताना आणि परत येताना बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र दाखवून परिवहन मंडळाच्या कोणत्याही बसमधून मुक्तपणे प्रवास करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com