ठेकेदाराने रस्त्यांचे मुरुमीकरण, खडीकरण वा डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता रस्ता ‘जैसे थे’ ठेवला आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. आयटीआय कॉलनीजवळील ग्राउंडनट सोसायटीत एका महिलेचे निधन झाले.
Funeral procession through muddy road in Kupwad leads to strong protest from grieving relatives and citizens.Sakal
कुपवाड : रस्ते खोदाईमुळे माधवनगर-कुपवाड, आयटीआय कॉलनी नजीक ग्राउंडनट सोसायटीतील रस्त्यावर दलदल झाली आहे. त्यामुळे शववाहिका पोहोचू शकली नसल्याने मृतदेह चिखलातून कसरत करून घेऊन न्यावा लागला. नातेवाइकांनी नागरिकांसह प्रशासनाचा निषेध केला.