बहे : एकाच वेळी होतात अंत्यसंस्कार, अन्‌ रक्षाविसर्जनही!

बहे हे राज्यातील बहुधा एकमेव गाव; पिढ्यान्‌पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा
bahe village
bahe villagesakal

बहे : गेल्या अनेक वर्षांपासून बहे येथे चालत आलेली अंत्यसंस्कारानंतर लगेच रक्षाविसर्जन ही परंपरा आजही पुढे चालू आहे. अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जन हे एकाच वेळी, अशी परंपरा असणारे हे राज्यातील बहुधा एकमेव गाव मानले जाते. प्लेगच्या साथीनंतर ही परंपरा सुरू झाल्याचे गावातील वयोवृद्ध सांगतात. (elders of the village say that this tradition started after the plague)

bahe village
'मोदींनी माझं ऐकलं', बूस्टर डोसच्या घोषणेनंतर महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया

राज्यात हिंदू धर्मात पिढ्यान्‌पिढ्यांपासून अनेक प्रथा-परंपरा-रीतिरिवाज चालत आलेले आहेत. काही रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांना शास्त्रीय बैठकही होती. काही प्रथा परंपरांमुळेही काही गावे ओळखली जातात. बहे गावाला प्रभू रामचंद्रांमुळे राज्यभर ओळखले जाते. कृष्णा नदीतील बेटावर प्रभू रामचंद्रांचे प्रसिद्ध पुरातन मंदिर आहे. त्याचबरोबर या गावाला आणखी एक जुनी ओळख आहे. येथे मृतांवर अंत्यसंस्कारानंतर लगेचच रक्षाविसर्जनविधी पार पाडला जातो.(Bahe village is known throughout the state for Lord Ramachandra)

bahe village
भारतात 'बूस्टर डोस' कधी आणि कुणाला मिळणार?

वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या कुशीत वसलेले बहे सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव! या गावात ही परंपरा सुमारे सव्वाशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. एखाद्या घरात प्लेगचा रुग्ण आढळल्यानंतर लगेच त्याचा मृत्यू होत होता. त्यावेळी अनेकांचे मृत्यू झाले. काही गावांमध्ये संपूर्ण स्मशानकळा आली होती. मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत होते. या साथीची तीव्रताच इतकी होती, की एकाला नदीवर पोहोचवल्यानंतर परत येताना पुढच्याला खांदा देण्याची तयारी ठेवावी लागत होती. बहे येथेही तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मृतांची वाढती संख्या आणि दहन द्यायला जागाच शिल्लक राहात नव्हती, त्यातच नदीचे वाढते पाणी. यामुळे अंत्यसंस्कारानंतर लगेचच माती लोटली जात होती.त्यावेळी सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर कृष्णा नदीकाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. सुमारे तीन-चार तासांनंतर पूर्ण राख झाल्यानंतर, लगेच माती लोटण्याचा (रक्षाविसर्जन) कार्यक्रम त्याच ठिकाणी घेतला जातो, मग वेळ रात्री-अपरात्रीची असली तरीही रक्षाविसर्जन विधी पार पाडला जातो. अंत्यविधीसाठी आलेले ग्रामस्थ, पै-पाहुणे, मित्रमंडळींना सुमारे चार तास तेथे थांबावे लागते. माती लोटल्यानंतरच सर्वजण घरी येतात.(Bahe is a village of about four and a half thousand people situated on the banks of river Krishna)

bahe village
चिपळूण : परशुराम घाटात संरक्षक भिंत हवी

बहे येथे कृष्णातीरी हुबालवाडी, कापूसखेड, नेर्ले, इस्लामपूर शहरातीलही अनेकजण अंत्यसंस्कारासाठी येतात. तेही येथील परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार अन्‌ रक्षाविसर्जन एकाचवेळी करतात. एकाचवेळी अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जन ही राज्यात बहुधा कोठेही पाहावयास मिळत नाही. त्यावेळेपासून सुरू झालेली परंपरा आजही जपली जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून, आमच्या जन्माच्याही आधीपासून ही प्रथा-परंपरा सुरू आहे. प्लेगची साथ आणि नदीला येणारा महापूर यामुळे त्यावेळी दहन द्यायला जागा शिल्लक नसायची. त्यामुळे दहन दिल्यानंतर लगेचच त्याच जागी-त्याचवेळेला माती लोटावी लागत होती. त्यावेळी सुरू झालेली परंपरा आजही सुरू आहे.

- पांडुरंग गुरव, वयोवृद्ध ग्रामस्थ, बहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com