
Banda Protest
Sakal
बांदा : कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ओंकार हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभाग यावर काहीच ठोस हालचाली करत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यातूनच त्यांनी मंगळवारपासून (ता. २१) शेतातच बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.