गडाख यांनी स्वीकारला जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार

Gadakh accepted the charge of Minister of Water Conservation
Gadakh accepted the charge of Minister of Water Conservation
Updated on

नगर : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मुंबई येथे मंत्रालयात आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. राज्यातील शेतकरीहिताचे कोणते विषय प्रलंबित आहेत, याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठकही घेतली. शेतकऱ्यांच्या हिताची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडाख यांनी या वेळी सांगितले. 

या वेळी उद्धव मंडलिक महाराज, सुनीलगिरी महाराज, रामनाथ पवार महाराज आदींनी उपस्थित राहून गडाख यांना शुभेच्छा दिल्या. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख या वेळी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार

मंत्री गडाख माध्यमांशी बोलताना म्हणाले, ""मला मिळालेल्या संधीतून शेतकऱ्यांच्या हिताची जास्तीत जास्त कामे व्हावीत यासाठी प्रयत्न करणार आहे. मृद व जलसंधारण हे खाते शेतकऱ्यांशी संबंधित आहे. या खात्याचे कामकाज आम्ही लोकाभिमुख करणार आहे. माझ्या आवडीचे खाते मिळाले आहे. मी आमदार असताना या खात्याशी संबंधित अनेक कामे करण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला आहे. या खात्यात अनेक चांगल्या योजना आहेत. त्या सर्व योजना अधिकाधिक लोकांपर्यंत नेऊन सर्वांच्या सहकार्याने, मदतीने राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आहोत.'' 

जलसंधारण खात्याच्या माध्यमातून मला राज्यातील शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा आभारी आहे, असेही गडाख म्हणाले.

अधिकाऱ्यांसमवेत बैठक

पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात खात्यांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी खात्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन राज्यातील जलसंधारणाच्या कामाची माहिती गडाख यांनी घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com