
सांगली : सर्व्हेनंतर लागू केलेली घरपट्टी अधिक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, करामधील वाढ लोकांना सुसह्य होईल अशीच हवी. त्यासाठी एकूण आकारणीचा सर्वांगीण अभ्यास करावा. तोपर्यंत पुढील सहा महिने आकारणीस स्थगिती द्यावी, असे आदेश आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले. आज त्यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.