
सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथील दुधगाव रस्त्यावर असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर उपाधीक्षकांचे पथक व ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. १७ जणांना ताब्यात घेतले असून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत.