Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Sangli latest news : अभिनेत्री भाग्यश्री यांनी सांगलीतील गणपती मंदिरात पूजा केल्यानंतर वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. संस्थानचे प्रमुख विजयसिंह राजे यांनी संताप व्यक्त करत मोठं वक्तव्य केलं.
Ganpati Panchayatan Sansthan Sangli temple dispute

Ganpati Panchayatan Sansthan Sangli temple dispute

esakal

Updated on

Sangli Ganpati temple dispute : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमधील वाद पुन्हा चिघळला आहे. अभिनेत्री भाग्यश्री यांनी गणपती मंदिरात जाऊन पूजा आणि आरती केल्यानंतर संस्थानचे प्रमुख विजयसिंह राजे पटवर्धन यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘भाग्यश्रीने केलेले कृत्य चुकीचे असून तिने माफी मागावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, ‘मी आजारी नाही, माझी तब्येत बरी आहे. कुणाला तसे वाटत असेल तर आजही या, किमान दोघांना लोळवण्याची ताकद आपल्यात आहे,’ असे म्हणत त्यांनी भाग्यश्रीच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com