अरे व्वा..संभाजी तलावात चिखल्या बदकांचा घोळका!

अरे व्वा..संभाजी तलावात चिखल्या बदकांचा घोळका!

सोलापूर : सोलापूरचे फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या व एकेकाळी स्थलांतरित बदकांसाठी माहेरघर असलेल्या धर्मवीर संभाजी तलाव परिसरात चिखल्या बदकांचा एक घोळका दिसून आला आहे. प्रदूषणामुळे येथील जैवविविधता धोक्‍यात आली असताना चिखल्या बदक दिसल्याने पक्षीप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे. 

क्लिक करा : 'ते' तिघे पहाटे दीड वाजता मंदिरात आले अन्‌...

प्रदूषणाच्या विळख्यात धर्मवीर संभाजी तलाव 
एकेकाळी कमळ फुलांचा बहर आणि विविध प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचा वावर धर्मवीर संभाजी तलाव परिसरात असायचा. मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्यात धर्मवीर संभाजी तलाव अडकले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत उत्तर युरोपीय देशात आणि सायबेरियन या प्रांतात मूळ वास्तव्यास असणाऱ्या चिखल्या बदकांचा एक मोठा थवा गेल्या महिनाभरापासून धर्मवीर संभाजी तलाव परिसरात आपला डेरा टाकून आहे. दररोज सूर्योदयाच्या वेळी तलावाच्या माजी सैनिकनगर व वसंतनगर या लोकवस्तीच्या बाजूला पाण्याच्या दुर्गंधीयुक्त डबक्‍यात उदरनिर्वाह चिखल्या बदक दिसत आहेत. 

क्लिक करा : शिपायाच्या मदतीने कर्जदारानेच बॅंकेवर मारला डल्ला

इंग्रजीत गार्गेनी नाव
"चिखल्या बदकाला इंग्रजीत गार्गेनी या नावाने ओळखले जाते. ही बदके युरोप खंडातील पॉलीऑर्क्‍टिक प्रदेशामध्ये मे-जून महिन्यात वीण घालतात. ही बदके दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी भारतीय उपखंडात पाणथळी गाठतात. पुढे भारतात आल्यानंतर अनेक जोड्यांचा घोळका करून अनुकूल वाटणाऱ्या पाणवठे व समुद्र किनाऱ्यावर सहा महिने आपली उपजीविका चालवतात. नंतर एप्रिल - मे महिन्यात आपल्या मूळ स्थानी निघून जातात', असे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले. महाराष्ट्र
 

आकाराने नेहमीच्या बदकापेक्षा जरा लहान असलेल्या चिखल्या बदकातील नर पक्षी रुबाबदार असतो. त्याचे डोके गुलाबी उदी रंगाचे असून त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. भुवया गडद व पांढरे असतात. पंख व खांदे निळसर करड्या रंगाचे असतात. पाणवनस्पतींचे कोवळे भाग हे या बदकांचे प्रमुख खाद्य आहे. चिखलातील कीटकांवरही ते ताव मारतात. 
- डॉ. अरविंद कुंभार, 
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक 

धर्मवीर संभाजी तलाव सध्या पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. येथील जैवविविधता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत सुद्धा स्थलांतरित पक्षी आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी तलावाचे संवर्धन करण्याची गरज आहे. 
- पंकज उपाध्याय, 
रहिवासी, माजी सैनिक नगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com