"जनरल प्रॅक्‍टिशनर्स' ना "ओपीडी'  सुरू ठेवण्याचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सांगली-"कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कलम 144 लागू करून संचारबंदी जाहीर केली आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक जनरल मेडिकल प्रॅक्‍टिशनर्सनी "लॉक डाऊन' केले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ शकतो. सध्या दैनंदिन आजाराचे अनेक रूग्ण मेडिकल्समध्ये जाऊन स्वत:च औषधे मागून घेत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर शासकीय रुग्णालयवर ताण पडू शकतो. त्यामुळे जनरल मेडिकल प्रॅक्‍टिशनर्सनी त्यांची "ओपीडी' सुरू ठेवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज "जनरल मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स फोरम' च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सदर बैठकीत अनेक डॉक्‍टरांनी शहरी व ग्रामीण भागातील "ओपीडी' बंद ठेवल्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे शासकीय रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय यांच्यावर ताण पडू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी "ओपीडी' सुरू ठेवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले. फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी "ओपीडी' सुरू ठेवण्यामध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. या अडचणींबाबत चर्चा झाली. 

बैठकीबाबत माहिती देताना फोरमचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. सनतकुमार पाटील म्हणाले, ""जिल्हा प्रशासनाने आम्हाला "ओपीडी' सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मात्र सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता डॉक्‍टर आणि कर्मचारी यांनी ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांशिवाय "ओपीडी' चालू करणे धोकादायक आहे. आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये जर एखादा कोरोना विषाणूचा वाहक असेल तर पुढे त्याचे संक्रमण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

आम्ही हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रशासनाने "ओपीडी' मध्ये गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत सूचना केली आहे. परंतु "जनरल प्रॅक्‍टिशनर्स' ची "ओपीडी' म्हणजे लहान खोलीच असते. त्यामुळे तेथे रुग्णांची गर्दी टाळणे अवघड आहे. प्रशासनाला आम्ही सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहोत. सध्यातरी ज्या डॉक्‍टरांना "ओपीडी' सुरू करायची असेल त्यांनी सुरू करावी असे सांगितले आहे. तसेच इतरांनी "ओपीडी' सुरू ठेवण्याबाबत दोन दिवसात संघटनेतर्फे अधिकृत माहिती दिली जाईल.'' 
संघटनेचे सचिव डॉ. विनोद पवार, उपाध्यक्ष डॉ. अरुण कोळी, तसेच डॉ. सुधीर पाटील, डॉ. आनंद पोळ, डॉ. स्वप्निल नाडे, डॉ. ओंकार वाले आदी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General Practitioners Appeal To Continue OPD ...