
सांगली : विकास आराखड्याच्या नकाशाअभावी महापालिका क्षेत्रातील विकासकामे आणि नवीन बांधकामे खोळंबली आहेत. जनतेमध्ये शासनाविरोधी असंतोष तयार होत आहे. अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत. तत्काळ प्रसिद्ध करावेत, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली.