esakal | उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करा ; खासदार मंगल अंगडींच्या सूचना | Paschim Maharashtra
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करा ; खासदार मंगल अंगडींच्या सूचना

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : सुमारे तीन वर्षापासून तिसऱ्या रेल्वे गेटवरील शहरातील चौथ्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. अजूनही अर्धवट स्थितीत असलेल्या या कामामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत. यामुळे सदर उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सुचना खासदार मंगल अंगडी यांनी रेल्वे विभाग व कंत्राटदारांना मंगळवारी (ता.१२) दिल्या. पाऊस असल्याने काम लांबले आहे, यामुळे येत्या जानेवारीपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून उड्डाणपुल खुला करून देऊ असे आश्‍वासन कंत्राटदारांनी यावेळी खासदारांना दिले.

चेंबर ऑफ कॉमर्सच्या विनंतीनुसार खासदार अंगडी यांनी सोमवारी उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचीन सबनीस, प्रभाकर नागरमुन्नोळी आदी उपस्थित होते. नैर्ऋत्य रेल्वेकडून या उड्डाणुपलाच काम केले जात आहे. या उड्डाणुलाच्या कामाला दिलेली मुदतही पूर्ण झाली आहे. तरी देखील अजूनही अर्धवट काम असून सध्या संथगतीने सुरु आहे. यासंबंधी अनेक वेळा सांगूनही कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याची तक्रार चेंबरच्या सदस्यांनी खासदारांकडे केली. यावर खासदारांनी त्यांना नागरिकांची गरज लक्षात घेऊन उड्डाणपुलाचे काम लवकर करा अशा सुचना केल्या.

चेंबरचे अध्यक्ष जुवळी म्हणाले, तुम्ही जानेवारीपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. जानेवारीपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही तर चेंबरचे सदस्य या ठिकाणी धरणे आंदोलन करतील. या कामाची माहिती प्रत्येक १५ दिवसाला एकदा घेतली जाईल. तुम्ही या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून काम करत आहात. मात्र, येथील कामगारांना कोणतीही सुरक्षा नाही. त्यांच्या जीवाला धोकाच आहे. नियमानुसार त्यांना सुरक्षा पुरवा. पुलावर तुमचे काम सुरु असते. खालून जाणाऱ्या वाहनधारकाच्या डोक्यात एखादी वस्तु पडल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा जाबही त्यांनी यावेळी विचारला. यावर कंत्राटदार निरुत्तर झाले. यंदा पाऊस अधून मधून येत आहे. त्यामुळे वेळेत उड्डाणपुलाचे काम होणे आवश्‍यक होते. याची तातडीने दखल द्या अशी मागणीही केली. यावेळी महापालिका अधिक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, राजेंद्र हरकुणी, हेंमेंद्र पौरवाल, महादेव चौगुले आदी उपस्थित होते.

loading image
go to top