घंटागाडीही होईल आता ट्रॅक 

 The ghantagadi will now be tracked
The ghantagadi will now be tracked

नगर : नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी महापालिकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने महापालिकेने अँड्राईड ऍप तयार केले आहे. हे ऍप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमधून अहमदनगर-एसडब्लूएम टाकून हे ऍप डाउनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

तक्रारदारांना दिलासा 
महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा संकलनासाठी अपुरी यंत्रणा यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने कचरा संकलन व वाहतुकीचे खासगीकरण केले आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट या अनुभवी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुसूत्रता येण्यास सुरवात झाली आहे. मात्र, अद्यापही घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी काही भागातून येत आहेत. 

गाड्यांना लावला जीपीएस 
कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना रोडमॅप तयार करुन देण्यात आलेला आहे. या वाहनांना जीपीएस लावण्यात आले आहे. त्याचे नियंत्रणही मोबाईल ऍपवरुन केले जाते. मात्र, नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी व नागरिकांना त्यांच्या घराच्या परिसरात घंटागाडी आल्याची माहिती मिळावी, यासाठी आता उपाययोजना केल्या जात आहेत. 

ऍपची निर्मिती 
महापालिकेकडून नव्याने मोबाईल ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरात घंटागाडी आल्याची माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे. हे ऍप नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. अँड्रॉईड मोबाईलवर हे ऍप वापरता येणार असून, त्यासाठी नागरिकांना स्वतःच्या घराचे लोकेशन सेट करावे लागणार आहे. तसेच नागरिकाचे नाव, मोबाईल नंबर टाकून "केवायसी' प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्याची माहिती ऍपवर संग्रहीत होणार आहे. 

अंतरदेखील समजणार 
नागरिकाने दिलेल्या लोकेशनच्या परिसरात घंटागाडी आल्यावर संबंधित नागरिकाला मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून गाडी आल्याची माहिती मिळणार आहे. किती अंतरावर गाडी आल्यावर माहिती हवी आहे, तेही निश्‍चित करता येणार आहे. कचरा गाडी घराजवळ आली नसल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल. दरम्यान, नागरिकांना तक्रारीसाठीही ऍपवर सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हे ऍप डाउनलोड करावे व मोबाईलवर कचरा गाडीची माहिती मिळवावी, असे आवाहन उपायुक्त सुनील पवार यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com