'तातडीने मंदिरे खुली करा'; सांगलीत 'भाजप'चे घंटानाद आंदोलन

'तातडीने मंदिरे खुली करा'; सांगलीत 'भाजप'चे घंटानाद आंदोलन
Summary

देशातील इतर राज्यात मात्र मंदिरे उघडण्यास स्थनिक सरकारांनी परवानगी दिलेली आहे. परंतु राज्यात मंदिरावरील बंदी का घालण्यात येते

सांगली : कोरोना (covid-19) आणि महापूराच्या पार्श्वभूमीवर जनता खचलेली आहे. एकीकडे सरकार मद्यालय, बाजारपेठा, आठवडी बाजार आदी सुरु करण्यास अडकाठी करीत नाही. मात्र देव, देवतांना बंदिस्त का ठेवले जात आहे. शासनाने तातडीने मंदिरे खुली करावीत, अशी मागणी 'भाजप'च्या वतीने आज घंटानाद आंदोलनाव्दारे करण्यात आली.

शहरातील गणपती मंदिरासमोर सकाळी करण्यात आलेल्या या घंटानाद आंदोलनास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, अध्यात्मिक आघाडीचे अजयकुमार वाले, दिपक शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, श्रीकांत शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, नीता केळकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गौतम पवार आदींसह अन्य 'भाजप'चे कार्यकर्ते उपस्थित होते.

'तातडीने मंदिरे खुली करा'; सांगलीत 'भाजप'चे घंटानाद आंदोलन
कातळांवर फुलले नंदनवन; ‘कास पठारा’ची अनुभूती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केली चार महिने मंदिरे, देवालय बंद ठेवली आहेत. सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास मनाई केली आहे. त्याच वेळी मद्यालय, बाजारपेठा, कार्यालये सुरू आहेत. गर्दीची ठिकाणांवरील बंधने शिथील केली आहेत. मंत्र्यांचे दौरे, विवाह समारंभ आदी सर्रास सुरु आहेत.

यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे. केवळ मंदिरे उघडी असली तर कोरोना होतो अशी सरकारची भूमिका आहे. मंदिरे बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारी कुटुंबांपुढे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांना कोणतीच मदत दिली जात नाही. देशातील इतर राज्यात मात्र मंदिरे उघडण्यास स्थनिक सरकारांनी परवानगी दिलेली आहे. परंतु राज्यात मंदिरावरील बंदी का घालण्यात येते याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी देणे आवश्यक आहे. श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असल्याची भूमिका याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

'तातडीने मंदिरे खुली करा'; सांगलीत 'भाजप'चे घंटानाद आंदोलन
शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर..... ;पाहा व्हिडिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com