VIDEO : घोडचे आवर्तन बंदय, मग ही काय वाहतंय साहेब....

VIDEO : घोडचे आवर्तन बंदय, मग ही काय वाहतंय साहेब....

श्रीगोंदे : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून पुन्हा गळती सुरु आहे. आवर्तन बंद होवून आठ दिवस झाले. मात्र कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु आहे. घोडखालची शेती अगोदरच अडचडणीत असताना ही गळती शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. जलसंपदाचे अधिकारी केवळ कागदी घोड नाचवित असून गळती बंद करण्यापेक्षा गळतीबद्दल कसा पत्रव्यवहार सुरु आहे, हे सांगण्यात ते धन्यता मानत असून ही डोळेझाक घोडच्या लाभधारकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. 


घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील शेती सिंचनाखाली येते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला धरण कोरडे पडत असल्याने घोडखालची शेतकरी उध्दवस्त झाला आहे. पाणी जपून वापरा असा कायम सल्ला देणाऱ्या अधिकारी व पुढाऱ्यांना धरणातून होणाऱ्या गळती दिसत नाही. कालव्यालगतच शेतकरी चोरुन पाणी वापरतो ही ओरड मोठ्या प्रमाणात होते. पायथ्याला पाणी न मिळणारा शेतकरी शेती पडीक ठेवू लागल आहे. अशा स्थितीत धरण शंभर टक्के भरल्यानंतरही गळतीचे शुल्ककाष्ठ पाठ सोडण्यास तयार नाही.

गेल्या तीन वर्षात सकाळने किमान पाच वेळा ही गळती अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. पुणे येतील यांत्रिकी विभागाने नंतर त्यावर पैसा खर्च करीत गळती बंद करण्यासाठी पाठबुड्यांचा आधार घेतला. मात्र तरीही गळती सुरुच आहे. लाभक्षेत्रात पाण्याची गरज कमी भासल्याने गेल्या महिन्यात सोडलेले आवर्तन लवकर बंद झाले. त्यामुळे वाचलेले पाणी उन्हाळ्यात मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नियोजने केले असले तरी या गळतीने त्यांचा भ्रमनिराश होणार आहे. 

पाणी गेले या गावांपर्यंत
कालव्यातून सुमारे पन्नास क्युसेक्सची गळती सुरु असून या गळतीचे पाणी बोरी, हंगेवाडी, चिंभळे, शिरसगावबोडखे, मढेवडगाव, श्रीगोंदे कारखाना, जंगलेवाडी, लिंपणगाव या गावांची हद्द ओलांडून काष्टीपर्यंत गेले आहे. त्यामुळे पाणी वायाला जाण्याचे प्रमाण किती मोठे आहे याची जाणीव होते. 

पत्रव्यवहार गांभीर्याने घेतला नाही
याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे हे यांत्रिकी विभागाला दोष देवून मोकळे झाले. आम्ही पत्रव्यवहार केला मात्र ते कामे वेळेवर करीत नसल्याचा त्यांचाच आरोप आहे. मात्र त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी त्यांना केलेल्या पत्रव्यवहार त्यांनी गांभीर्याने घेतला नसल्याने ही वेळ आल्याचे वास्तव आहे. 

पाणी चोरीचा डाव
घोडखालचा शेतकरी आता शेवटच्या घटका मोजत असून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि काही कर्मचाऱ्यांचा पाणी चोरुन विकण्याचा डाव यामुळे अडचणी वाढल्या आहेत. या गळतीची चौकशी होवून संबधीतांवर कारवाई व्हावी.
संजय रोडे, लाभधारक जंगलेवाडी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com