कुंडल : येथील जैन तीर्थक्षेत्र असलेल्या पहाडावरील गिरी पार्श्वनाथ जैन मंदिरातील (Giri Parswanath Jain Temple) मूर्तींची विटंबना झाल्याचा प्रकार सकाळी निदर्शनास आला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध कुंडल पोलिस ठाण्यात (Kundal Police Station) गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा जैन समाज संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.