Electric Shock : मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना विजेचा धक्का लागून बालिकेचा दुर्दैवी अंत; जोरदार धक्क्याने बेशुद्ध पडली अन्..
Electric Shock Incident in Khanapur : विटांसाठीच्या मातीवर मुले सायंकाळी खेळत होती. घरावरून वाहिनीद्वारे वीज आणण्यात आली होती. मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना वरून वीजवाहिनीला हात लागल्याने मानवी चोपडे हिला जोरदार विजेचा धक्का लागला.
खानापूर : इदलहोंड येथे खेळताना विजेचा धक्का लागून बालिकेचा मृत्यू (Electric Shock) झाला, तर बालक जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात मानवी मारुती चोपडे ( १०) हिचा मृत्यू झाला. तर, चैतन्य बसवंत पाटील (वय ८, रा. देवगनहट्टी) हा जखमी झाला आहे.