शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide) यांच्या संकल्पनेतून स्वराज्याची राजधानी रायगडावर १९९१ मध्ये १४ जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीदिवशी नित्यपूजेला प्रारंभ झाला. त्या घटनेला आता सुमारे ३५ वर्षे पूर्ण झाली.
सांगली : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांच्या राजधानी रायगडावरील (Raigad) समाधीची नित्यपूजा करण्याचा उपक्रम शिवप्रतिष्ठानमार्फत सुरू आहे. या पूजेसाठी लागणारे पुष्पहार सांगलीतील सुभाष आण्णाप्पा जाधव हे अत्यंत माफक किमतीत देत आहे. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ही नित्यसेवा सुरू असून, शिवरायांच्या समाधीसह सिंहासन, पुतळ्यावर जाधव यांनी तयार केलेले हार व फुले रोज विराजमान होतात. साडेतीन दशकांपासून सुरू असलेली ही नित्यसेवा सांगलीचे वैशिष्ट्य ठरत आहे.