गोवा, केरळमधून कर्नाटकात येणाऱ्यांना RT-PCR सक्तीतून सूट

या निर्णयामुळे कोणत्याही मार्गाने कर्नाटकात प्रवेश करताना निगेटिव्ह अहवालाची सक्ती असणार नाही.
RT-PCR
RT-PCResakal
Updated on
Summary

या निर्णयामुळे कोणत्याही मार्गाने कर्नाटकात प्रवेश करताना निगेटिव्ह अहवालाची सक्ती असणार नाही.

बेळगाव : महाराष्ट्रनंतर आता गोवा व केरळ राज्यातून कर्नाटकात येण्यासाठीची आरटीपीसीआर तपासणी निगेटिव्ह अहवालाची सक्ती रद्द करण्यात आली आहे. गुरुवारी (१७) राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी. ए. अनिलकुमार यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्यासाठीची ही सक्ती रद्द करण्यात आली होती. आता आठवडाभरानंतर गोवा व केरळच्या नागरिकांना या सक्तीतून मुक्त करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय आता गोवा विधानसभा निवडणूक संपल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल सक्ती रद्द करण्यात आली आहे. मात्र कोरोना लसीच्या दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सीमेवरील तपासणी नाक्यावर दाखवावे लागणार आहे. त्यानंतरच कर्नाटकात प्रवेश दिला जाईल. या निर्णयामुळे कोणत्याही मार्गाने कर्नाटकात प्रवेश करताना निगेटिव्ह अहवालाची सक्ती असणार नाही.

RT-PCR
कर्नाटक : हिजाब प्रकरणावर उद्या सुनावणी; आज काय घडलं जाणून घ्या

कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर महाराष्ट्र, गोवा व केरळ या तीनच राज्यातून येणाऱ्यांना सक्ती करण्यात आली होती. या नव्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ही सक्ती रद्द करण्यात आल्याचेही अनिलकुमार यांनी नमूद केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कर्नाटक सरकारने कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र, गोवा व केरळ राज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांना आरटीपीसीआर सक्ती करण्यात आली हाती. म्हणजे या तिन्ही राज्यातून कर्नाटकात प्रवेश करताना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र तपासणी नाक्यावर दाखवावे लागत होते.

हे प्रमाणपत्र नसेल तर माघारी पाठवून दिले जात होते. यावर तोडगा म्हणून बोगस आरटीपीसीआर प्रमाणपत्र देण्याचा प्रकार कोल्हापूर येथे सुरू होता. त्याचा पर्दाफाश निपाणी पोलिसांनी केला. पण आता ही सक्तीचं मागे घेण्यात आल्याने तिन्ही राज्यातून कर्नाटकात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सीमेवरील सर्व तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर सक्ती काटेकोरपणे केली जात होती. त्याचा परिणाम आंतरराज्य प्रवासी वाहतुकीवर झाला होता. पण आता ही वाहतूक पुन्हा सुरू होईल. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर सप्टेंबर महिन्यात आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्यात आली होती पण दोन महिन्यात पुन्हा लागू करण्यात आली होती. सक्ती मागे घेतली असली तरी सीमेवरील तपासणी नाके सुरूच राहणार आहेत.

RT-PCR
युक्रेनने रशियन बंडखोरांवर डागले बाॅम्ब, अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
why milk collection is falling in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com