खरसुंडीत शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात पाच लाखांची उलाढाल

Goat-sheep market turnover of Rs
Goat-sheep market turnover of Rs

खरसुंडी : खरसुंडी येथील श्री सिद्धनाथांच्या पौषी यात्रेस सुरवात झाली आहे. दोन दिवस झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात पाच लाखांची उलाढाल झाली. जातिवंत खिल्लार जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार स्थळ प्रथमच बदलण्यात आल्याने खिल्लार जनावरांची यात्रा एकाच मैदानात भरली आहे. 

सिद्धनाथांच्या पौषी यात्रेस आज पासून सुरवात जातिवंत खिल्लार जनावरांच्या करिता खरसुंडी यात्रा तीन राज्यांत प्रसिद्ध आहे. माणपट्टयाची या यात्रेत चार तालुक्‍यांतील खिल्लार पशुधन शेतकरी आपली जनावरे यात्रेत आणतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली वर्षभर कोणत्या गावातील यात्रा झालेल्या नाहीत. प्रशासनाने जनावरांच्या बाजारात परवानगी दिल्यामुळे पहिली यात्रा भरली आहे. शेतकऱ्यांच्या खिलार जनावरास ही एकमेव बाजार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे यात्रेत आणली आहेत. खिल्लार जनावरांची आवक दोन दिवसांपासून वाहन व बैलगाडीने जनावरे यात्रेत आहेत. व्यापार करणारे हेडी वर्षभर व्यापार बंद असल्याने यात्रेत आली आहेत. 

दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांचा बाजार यात्रेनिमित्त भरला. यामध्ये शेळ्यांची आवक जास्त तर मेंढ्यांची आवक कमी झाली. दोन हजारांहून अधिक जनावरे बाजारात आली होती. यामध्ये खरेदी-विक्री होऊन पाच लाखांची उलाढाल झाली. शेळ्या-मेंढ्यांचा बाजारही तेजीत होता. जिल्हा व जिल्हा बाह्य इतर जिल्ह्यातील खरेदीसाठी व्यापारी आलेले होते. पौषी यात्रा गावाच्या परिसरात भरत होती, मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रशासनाने यात्रा परिसर बदलण्याचा निर्णय घेतला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने गावापासून एक किमी अंतरावर मोकळे मैदान असलेल्या खरसुंडी भिवघाट रोडवर यात्रास्थळ निश्‍चित केले. यात्रास्थळ बदलल्यामुळे जनावरांचा बाजार एक ठिकाणी व्यापारी व पशुपालन शेतकऱ्यांसाठी योग्य जागेची निवड झाली आहे. 

मार्केट समितीतर्फे सोयी 
पशुपालन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने केल्यामुळे यात्रा भरवण्यात यश आले. यात्रेत कितीही मोठ्या प्रमाणात जनावरांची आवक झाली तरीही हे मैदान खुले असल्यामुळे यात्रेसाठी फायदेशीर आहे. मार्केट समितीच्या वतीने दिवाबत्ती व पाण्याची सोय करणे सोपे आहे. यावेळी टॅंकरद्वारे पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रेतून कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक दुकाने लावण्यास बंदी असल्यामुळे दुकाने आलेली नाहीत. सध्या जनावरांच्या यात्रेकरता हीच जागा योग्य आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com