लग्न मुहूर्ताच्या तोंडावर खरेदीदारांच्या तोंडावर फुलले हास्य ; वर्षभरानंतर सोन्याचे दर पूर्वपदावर

gold rate stable after one year in sangli good news for buyer
gold rate stable after one year in sangli good news for buyer
Updated on

सांगली : सुवर्ण बाजारातील अनिश्‍चिततेचा एक नमुना सध्या पहायला मिळत आहे. अचानक उसळी मारून तब्बल ५५ हजार रुपये प्रतितोळ्याहून अधिक दरवाढ झालेल्या सोन्याच्या दरात आता तब्बल दहा हजारांनी घसरण झाली आहे. खरं तर सोने पूर्वपदावर आले. गेल्यावर्षी मार्च महिन्यात ४४ ते ४५ हजार रुपये दर होता. आताही तोच दर झाला आणि खरेदीदारांची पावले सराफ पेठेकडे वळली आहेत.

जुलै २०२० पासून सातत्याने सोने दराने ५० हजार रुपये प्रति दहा ग्रॅमहून अधिकचा आलेख कायम ठेवला. सोन्याचा दर ७० हजार रुपयांवर जाईल, असा एक अंदाज कुणीतरी बांधला. तोच खरा माणून अनेकांनी त्या काळात सोन्याची खरेदी केली. काहींनी बॅंकेतील ठेवी मोडून सोन्यात गुंतवणूक  केली. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर उच्चांकी होता. त्यानंतर दोनच महिन्यात लग्नसराई सुरू होणार होती. त्यामुळे अनेकांनी लग्नासाठी म्हणून तोच कमी दर गृहीत धरून खरेदी केली होती. त्या साऱ्यांना आता डोक्‍याला हात लावण्याची वेळ यावी, अशी दरात घसरण झाली. दर तब्बल दहा हजारहून अधिक खाली आला.

कोरोना संकट काळात गुंतवणूक क्षेत्रातील अनिश्‍चितता वाढल्यामुळे सोन्याचा दरात मोठी वाढ झाली होती. आता कोरोनावरील लसीकरण झपाट्याने होत आहे. त्याचा परिणाम जगभरातील गुंतवणूक क्षेत्रावर झाला आहे. त्याचा सोने दरावरही परिणाम झाल्याचे सांगितले जाते. हा दर आणखी खाली येणार की आता स्थिर होणार, याकडे लक्ष असेल. या संधीचा फायदा घेत लोकांनी खरेदीचा धडाका लावला आहे. या काळात लग्नाचा मुहूर्त असलेल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

"गेल्यावर्षी मार्चमध्ये जेवढे दर होते तेवढेच आता आहेत. सोने पूर्वपदावर आले आहे. साहजिकच, लोकांचा खरेदीकडे ओढा वाढला आहे. उत्साह दिसत आहे. दर कमी आल्याने लोक येत आहेत. लग्नसराईत त्याचा फायदाच होतो आहे."

- गणेश गाडगीळ, संचालक, पी. एन. जी., सांगली

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com