आनंदाची बातमी ः 52 हजार  गरीबांच्या "किचन'मध्ये उज्वला 

lpg_cylinder_660_010320111843.jpg
lpg_cylinder_660_010320111843.jpg
Updated on: 

सांगली ः "कोरोना' च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. संचारबंदीतील स्थितीला आर्थिक झळ कमी बसावी म्हणून शासनाने गरीब व आरोग्य सेवा कामगारांसह प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 1 एप्रिल ते 30 जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत एलपीजी गॅस सिंलेडर देण्याची तरतूद केली. जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 177 लाभार्थी आहेत. 1 एप्रिलपासून आजअखेर 52 हजार 679 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. 

योजने अंतर्गत उज्वला ग्राहकांच्या बॅंक खात्यात दरमहिन्याच्या 14.2 किलो रिफिलच्या किंमतीएवढी आगाऊ रक्कम जमा करण्यात येते. महिन्याला एक प्रमाणे तीन रिफीलची तरतूद आहे. ज्या ग्राहकांकडे 5 किलोचे सिलेंडर आहे त्यांना महिन्याला 3 तर योजनेच्या अवधीत फक्त 8 रिफिलची तरतूद आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्याकडील रक्कमेतून सिलेंडर घेतला नाही तर त्यांना पुढील महिन्यात आगाऊ रक्कम मिळत नाही.

आगाऊ रक्कम मिळण्यासाठी ग्राहकांने बॅंक खाते सुरू असण्याबाबत खात्री करणे आवश्‍यक आहे. ज्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम मिळाली नाही, त्यांनी गॅस वितरकांशी संपर्क साधावा किंवा ऑइल कंपनीच्या हेल्पलाईन- एच पी गॅस, इंडेन गॅस 18002333555, भारत गॅस 1800224344 क्रमांकावर संपर्क साधावा. आधार लिंक न झाल्याबाबतची कारणे जाणून त्याबाबत बॅंकेत जावून सुधारणा करून घ्यावी. 

""आमचे कुटुंब सहा जणांचे आहे. पुरुष गवंडी काम करतात. लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत 730 रूपये इतकी रक्कम जमा झाली. त्यातून गॅस घेतला. योजनेची खूप मदत झाली.'' 
-सारिका माने, नविन रेल्वे स्टेशन रोड, सांगली. 

""लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिघडली. प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत 730 रूपये इतकी रक्कम जमा झाली. त्यातून गॅस घेतला.'' 

0 शोभा पवार, सांगली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com