esakal | खुषखबर...नियमित कर्जदारांना मिळणार दुप्पट लाभ !
sakal

बोलून बातमी शोधा

kisan_karjmafi
  • राज्यात 44.70 लाख नियमित कर्जदार
  • नियमित कर्जदारांना मिळणार प्रत्येकी 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान
  • नव्या कर्जमाफीसाठी लागणार 63 हजार कोटी
  • मंत्रिमंडळ बैठकीनंतर ठरणार कार्यवाही

खुषखबर...नियमित कर्जदारांना मिळणार दुप्पट लाभ !

sakal_logo
By
तात्या लांडगे
सोलापूर : मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची रक्‍कम व व्याज सरकार भरणार आहे. तर सप्टेंबर 2019 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्याला प्रत्येकी दोन लाखांची माफी जाहीर करण्यात आली. मात्र, नियमित कर्जदारांची नाराजी नको या हेतूने त्यांना मागील कर्जमाफीच्या तुलनेत आता दुप्पट (50 हजार रुपये) रक्‍कम दिली जाण्याची शक्‍यता आहे. राज्यातील 44 लाख 70 हजार नियमित कर्जदारांसाठी तब्बल 25 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.


हेही वाचाच....अरे वा...! सर्वात कमी वयात न्यायाधीश बनण्याचा मान तोळणूरच्या आयेशाला


राज्यातील एक कोटी 53 लाख शेतकऱ्यांपैकी एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांची तब्बल एक लाख 35 हजार कोटींची येणेबाकी आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि पश्‍चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिम अशा पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वाधिक थकबाकी आहे. सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी सुमारे 40 हजार कोटी रुपये लागणार आहेत. नियमित कर्जदारांसाठी सुमारे 25 हजार कोटी लागणार आहेत. दरम्यान, मागील कर्जमाफीत दीड लाखांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपये मिळणार का, दोन लाख रुपये देताना उर्वरित रकमेचे काय, दोन लाख रुपये व्याजात की मुद्दलातून कपात होणार, दोन लाखांची कर्जमाफी बड्या शेतकऱ्यांनाही राहणार का, दोन लाखांची माफी कोणत्या कर्जाला मिळणार (मध्यम की दीर्घ) याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शासन निर्णय निघाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.


हेही वाचाच...अरेच्चा...27 वर्षांनंतर आलेलाही मुहूर्त हुकलाच


राज्याची स्थिती
एकूण शेतकरी
1.53 कोटी
येणेबाकीदार शेतकरी
1.08 कोटी
एकूण येणेबाकी
1 लाख 35 हजार कोटी
नियमित कर्जदार
44.70 लाख
नव्या कर्जमाफीची अंदाजित रक्‍कम
63 हजार कोटी


हेही वाचाच...कठीण आहे....कोट्यवधींचा खर्च करुनही कुष्ठरोग निर्मूलन होईना


बॅंकांना ऑनलाइन भरावी लागणार माहिती
राज्यातील नियमित कर्जदारांसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. राज्यात सुमारे 45 लाख नियमित कर्जदार असून पूर्वीच्या कर्जमाफीच्या तुलनेत आता नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ होईल. जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती मागवून घेतली जाईल. त्यानुसार संबंधित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
- डी. एस. साळुंखे, विभागीय सहनिबंधक, पुणे
 
loading image
go to top