पडळकरजी, भाजपबद्दलच्या 'त्या' बिरोबाच्या शपथेचे झालं काय?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे, की काहीही झालं तरी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केले होते. भाजप सरकारने आपल्याला आरक्षण दिलेले नाही. माझ्या घरातून माझी आई, भाऊ आणि मी जरी भाजपकडून उभे राहीलो तर भाजपला मतदान द्यायचे नाही, तुम्हाला बिरोबाची शपथ आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्याच्या आशेवर भाजपमध्ये सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मेळाव्यात केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पडळकरांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर सोशल मीडियात त्यांचा भाजपवर जोरदार टीका केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे, की काहीही झालं तरी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केले होते. भाजप सरकारने आपल्याला आरक्षण दिलेले नाही. माझ्या घरातून माझी आई, भाऊ आणि मी जरी भाजपकडून उभे राहीलो तर भाजपला मतदान द्यायचे नाही, तुम्हाला बिरोबाची शपथ आहे.

आता याच शपथेची पडळकरांना आठवण करून देण्यात येत आहे. या शपथेची आता काय झाले? कशामुळे तुम्ही भाजपमध्ये सहभागी झाले? शपथ घेतलेली विसरायची नाही? अशा अनेक प्रश्नांचा त्यांच्यावर भडीमार होत असून, त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopichan Padalkar video viral on social media