
जत: ‘‘शहरात (ता. २८) पाणी योजनेचा प्रारंभ होत आहे. त्यास आमच्या शुभेच्छा. परंतु, योजनेशी आमदार गोपीचंद पडळकर यांचा संबंध नाही. पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून श्रेय, पक्षीय सोहळा होत आहे,’’ असा टोला सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व पदाधिकाऱ्यांनी आज येथे आयोजित पत्रकार बैठकीत लगावला. काँग्रेसचे नेते अशोकराव बन्नेनवर, माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, अरुण साळे, मुन्ना पखाली, नीलेश बामणे, महादेव कोळी, इराण्णा निडोणी आदी उपस्थित होते.