

Gopichand Padalkar sangli jilha bank
esakal
Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत हा निर्णय दिला. काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय झाल्याने सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.