
सांगली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना तीन महिन्यांचे धान्य एकदम मिळणार आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त व दुर्गम भागाचा विचार करून प्रशासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे.