esakal | कडक बंदोबस्तात राज्यपाल कोश्‍यारी यांचा सांगली दौरा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

कडक बंदोबस्तात राज्यपाल कोश्‍यारी यांचा सांगली दौरा सुरु

कडक बंदोबस्तात राज्यपाल कोश्‍यारी यांचा सांगली दौरा सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या सांगली दौऱ्याला सुरवात झाली आहे. अतिशय कडक पोलिस बंदोबस्तात ते कोल्हापुरातून सांगलीत दाखल झाले. येथील माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात अर्धा तास त्यांनी चहापान केले. तेथे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत केंद्रीय मंत्री कपील पाटील उपस्थित होते.

कोश्‍यारी सकाळी ११.३० वाजता विश्रामगृहातून सांगलीवाडीतील लक्ष्मीफाट्यावरील मंगल कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आणि तेथे आता प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला आहे. राज्यपाल कोश्‍यारी यांच्या दौऱ्यानिमित्ताने सांगली महापालिका क्षेत्रात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्वच्छता करण्यात आली असून रस्त्याच्या कडेला पावडर फवारणी करण्यात आली आहे. पुष्पराज चौकापासून ते शहरातील प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: रत्नागिरीत 300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 155 तडीपार

विश्रामगृहाच्या परिसरातील सर्व नागरी हालचाली थांबवण्यात आल्या आहेत. या भागात काही गोदाम आहेत. तेथे येणारी वाहनेही थांबवण्यात आली आहेत. श्री. कोश्‍यारी दुपारी पुन्हा येथे येणार असल्याने सायंकाळी चारपर्यंत येथील हालचालींवर बंधन असेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या फौंडेशनतर्फे पूरग्रस्त कुटुंबातील मुलींना मदत ठेवीचे धनादेश वितरण करण्याचा कार्यक्रम श्री. कोश्‍यारी यांच्या हस्ते होत आहे. ते पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

loading image
go to top