Govind Pansare Case : पानसरे हत्या प्रकरणाला नवं वळण? संशयित आरोपी समीर गायकवाडच्या मृत्यूनंतर 'सनातन'चा धक्कादायक आरोप

Govind Pansare Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड यांच्यावर आरोप झाले असून, सनातन संस्थेने अटक नाहक असल्याचा दावा करत तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Govind Pansare Case

Govind Pansare Case

esakal

Updated on

सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील (Govind Pansare Case) संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ४५, रा. विकास चौक, सांगली) याचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समीर गायकवाडवर न्यायालयात हत्येसंदर्भात आरोपपत्र दाखल केले होते. मागील दहा वर्षांपासून याप्रकरणाची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. चार वर्षांपासून समीर जामिनावर होता. खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com