esakal | सोलापुरात महिलांच्या गोविंदा पथकाने वेधले लक्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

dahihandi.jpg

साेलापुर शहरात विविध मंडळांनी उंचच उंच दहीहंडी बांधल्या होत्या. जुळे सोलापुरात महिला गोविंदा पथकाच्या दहीहंडी उत्सवाने सर्वांचे लक्ष वेधले. 

सोलापुरात महिलांच्या गोविंदा पथकाने वेधले लक्ष 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गोविंदा रे गोपाळा...च्या निनादात सोलापुरात शनिवारी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा झाला. शहरात विविध मंडळांनी उंचच उंच दहीहंडी बांधल्या होत्या. जुळे सोलापुरात महिला गोविंदा पथकाच्या दहीहंडी उत्सवाने सर्वांचे लक्ष वेधले. 

जुळे सोलापुरातील वैष्णवी प्लाझा याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते श्‍याम कदम यांच्या पुढाकारातून महिलांची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. यशदा फाउंडेशन, प्रारंभ प्रतिष्ठान, ज्ञानज्योती संस्था, सई महिला प्रतिष्ठान आणि आशा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. या वेळी नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका फिरदोस पटेल, इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, करण लांबतुरे, श्‍याम कदम, चेतन चौधरी, माधुरी पांढरे, अरविंद शेळके, अविनाश फडतरे, अनिता गावडे, सपना कदम, संजय कोळी आदी उपस्थित होते.

या वेळी शमा म्युझिकल यांच्यावतीने देशभक्तिपर आणि दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने गाण्यांचे सादरीकरण अजित शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. प्रारंभ प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ढोल वादन करून सर्वांचा उत्साह वाढविला. 

बाळीवेस येथे वडियाराज सामाजिक संस्थेच्या वतीने दहीहंडी आयोजिली होती. या वेळी पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड, फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंके, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, नगरसेवक आनंद चंदनशिवे, वडियाराज सामाजिक संस्थेचे संस्थापक नितीन बंदपट्टे ,नागेश रणखांबे, सुहास सावंत, गौतम भांडेकर, राजाभाऊ कलकरे, महादेव अलकुंटे, विकी बंदपट्टे, नंदकुमार पाटील, किसन मुद्दे, सदाशिव मुद्दे आदी उपस्थित होते. 

दयावान ग्रुपच्या वतीने हरित सोलापूरचा संकल्प जाहीर करत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. नगरसेवक विनायक विटकर यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस विजय चौक या ठिकाणी उंचावर दहीहंडी बांधली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, माजी नगरसेवक आनंद जाधव, उद्योजक महेश कापडिया, नगरसेवक अमर पुदाले, नागेश बुगडे, अविनाश पाटील, संजय कणके, सहायक आयुक्त नागेश चौगुले, आयबीचे राजेंद्र पाटील, योगेश कुंदुर, राजकुमार हौशेट्टी यांनी गोविंदांचा उत्साह वाढविला.

या वेळी नगरसेवक विनायक विटकर यांनी हरित सोलापूर करण्याचे आवाहन केले. वडार समाजाच्या गोविंद पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आली. दत्त चौकात रुद्राक्ष प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात तरुणांचा उत्साही सहभाग दिसून आला. दरम्यान, शहरात सर्वत्र पोलिसांनी सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात केला होता.

loading image
go to top