Ajitrao Ghorpade : 'ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना भविष्यात संधी देणार नाही'; माजी मंत्र्यांचा स्पष्ट इशारा

शेतकरी विकास आघाडी (Shetkari Vikas Aghadi) ही विचारांची संघटना आहे.
Gram Panchayat Election Former minister Ajitrao Ghorpade
Gram Panchayat Election Former minister Ajitrao Ghorpadeesakal
Updated on
Summary

यापुढील काळात विकासाच्या विचारावर लोकांनी मतदान करावे, असे आवाहन माजी मंत्री घोरपडे यांनी केले.

कवठेमहांकाळ : ‘‘शेतकरी विकास आघाडी (Shetkari Vikas Aghadi) ही विचारांची संघटना आहे. ज्यांना विकास आघाडीची तत्त्वे मान्य नसतील, त्यांना रस्ता मोकळा आहे. ज्यांनी पार्टीचा विश्वासघात केला, त्यांना भविष्यात संधी दिली जाणार नाही अन् यापुढे सहन केले जाणार नाही,’’ असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade) यांनी दिला.

येथील दूध संघात शेतकरी विकास आघाडीच्या नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. राजवर्धन घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार झाला. या वेळी शेतकरी दूध प्रक्रिया संघाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार झाला.

Gram Panchayat Election Former minister Ajitrao Ghorpade
Loksabha Election : एक दिवस मी भारताच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होईन; महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास

माजी मंत्री घोरपडे म्हणाले, नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. त्यांनी गावचा विकास करावा. सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगत गत पाच वर्षांपूर्वी बाजार समिती निवडणूक झाली. यात काही विकृत माणसे निवडून आली. त्यांच्यामुळे बाजार समितीला वाळवी लागली आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची टीका केली.

कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने मोठे आर्थिक परिवर्तन झाले आहे. यातच काही संस्था चांगल्या चालल्या तर सर्वांचे हित होते आणि आपल्या डोळ्यांसमोर सर्वसामान्य शेतकऱ्याचे हित असते. तालुक्यातील काही संस्था बंद पडल्याने विकास रखडला असून योग्य माणसे संस्थेत असतील तर संस्था चालते. तेव्हा यापुढील काळात विकासाच्या विचारावर लोकांनी मतदान करावे, असे आवाहनही माजी मंत्री घोरपडे यांनी केले.

Gram Panchayat Election Former minister Ajitrao Ghorpade
'या' योजनेवरून कोल्हापुरात राजकारण तापलं; सतेज पाटील-क्षीरसागर आमनेसामने, इंगवलेंनीही घेतला बंटींचा समाचार

या वेळी राजवर्धन घोरपडे, माजी सरपंच कांता भोसले, सरपंच प्रवीण पवार, शिवदास भोसले, नितीन कांबळे, अरुण भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. तात्यासाहेब नलवडे, पांडुरंग पाटील यांनी प्रास्तविक केले. मनोज सदामते यांनी सूत्रसंचालन केले.

राजाराम पाटील, ईश्वर पवार, बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील, सरपंच दादासाहेब चोरमुले, तानाजी शिंदे, विजय पवार, माजी उपसभापती बाबासाहेब पाटील, रावसाहेब सदामते, तुकाराम पाटील, विश्वनाथ पाटील, अजितराव शिंदे, संजय चव्हाण, बाबूराव सूर्यवंशी, खरेदी-विक्री संघाचे संचालक संभाजी पवार, सचिन पाटील यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Gram Panchayat Election Former minister Ajitrao Ghorpade
Kolhapur : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगेंची दसरा चौकात धडाडणार तोफ; सभेला 2 ते 5 लाखांच्या उपस्थितीची शक्यता!

‘नव्या साखर कारखान्याची लवकरच उभारणी’

‘‘तालुक्यात पाणी आल्याने तालुक्यातील शेतीत परिवर्तन झाले आहे. आता उसाला न्याय देण्याचे काम शिल्लक आहे. तेही यापुढील काळात लवकरच पूर्ण होईल,’’ असे सांगत, राज्यातील काही नेत्यांनी आणि आपल्यातीलच काहींनी कारखाना सुरू होऊ नये, याकरिता अनेक अडथळे आणले. मात्र कितीही मोठ्या नेत्यांनी अडथळे आणले तरी कारखान्याची मंजुरी आणली. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी लवकरच राजवर्धन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नव्या साखर कारखान्याची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री घोरपडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Bori Khurd Villagers Protest by Performing Funeral at Gram Panchayat Office Due to Absence of Cremation Ground
Marathi News Esakal
www.esakal.com