Kolhapur : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगेंची दसरा चौकात धडाडणार तोफ; सभेला 2 ते 5 लाखांच्या उपस्थितीची शक्यता!

जरांगे-पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनासाठी बाहेर पडले आहेत.
Manoj Jarange-Patil warning to Maharashtra government
Manoj Jarange-Patil warning to Maharashtra governmentesakal
Updated on
Summary

‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासमवेत सभेबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्टेज उभारले जाणार आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) योद्धा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची तोफ १७ नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकात होणाऱ्या सभेत धडाडणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात दुपारी दोन वाजता सभेस सुरुवात होईल. तत्पूर्वी, ते नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक येथे नतमस्तक होणार असून, जिल्ह्यातून दोन ते पाच लाख मराठा बांधव सभेस येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange-Patil warning to Maharashtra government
Karnataka Politics : लिंगायत मतदार भाजपकडं वळणार? 'या' बड्या नेत्याच्या सुपुत्राला 'प्रदेशाध्यक्ष' करुन भाजपनं खेळला वेगळाच डाव

श्री. मुळीक म्हणाले, ‘जरांगे-पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनासाठी बाहेर पडले आहेत. ते १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात येत असून, सर्व तालुक्यांतील समन्वयक ग्रामीण भागातील मराठा बांधवांना सभेसाठी येण्याकरिता आवाहन करत आहेत. उन्हाचा तडाखा लक्षात घेता भगवी टोपी, भगवे झेंडे, पाण्याची बाटली घेऊन बांधवांनी सभेच्या ठिकाणी यावे. लाखोंच्या संख्येने बांधव येणार असल्याने पार्किंगची व्यवस्था मंगळवारी (ता. १४) जाहीर केली जाणार आहे.’

Manoj Jarange-Patil warning to Maharashtra government
Loksabha Election : एक दिवस मी भारताच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होईन; महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास

बाबा इंदुलकर म्हणाले, ‘मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चाळीस वर्षे रखडला आहे. तो सुटावा, अशी मराठा समाजाची भावना आहे. समतेच्या नगरीत राजर्षी शाहूंच्या पायाशी ही सभा होत असून, सभेसाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता दहा स्क्रीन ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.’

दिलीप देसाई म्हणाले, ‘मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत जगत आला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी यावे आणि आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करावा.’ पत्रकार परिषदेस अनिल घाटगे, शशिकांत पाटील, सुभाष जाधव, शैलजा भोसले, महादेव पाटील, अवधूत पाटील, सुभाष जाधव, उदय लाड उपस्थित होते.

Manoj Jarange-Patil warning to Maharashtra government
'या' योजनेवरून कोल्हापुरात राजकारण तापलं; सतेज पाटील-क्षीरसागर आमनेसामने, इंगवलेंनीही घेतला बंटींचा समाचार

पैसे गोळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू

‘मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही समाजकंटक पैसे गोळा करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दसरा चौकात संबंधितास कोल्हापुरी चप्पलचा प्रसाद दिला जाईल. त्यामुळे कोणी पैशांची मागणी करत असेल तर सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक व बाबा इंदुलकर यांच्याशी संपर्क साधावा’, असे आवाहन बाबा पार्टे यांनी केले.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसमवेत चर्चा करणार

‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासमवेत सभेबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्टेज उभारले जाणार आहे. तेथे जरांगे-पाटील यांचे स्वागत केले जाणार आहे,’ असे इंदुलकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahu Maharaj Slams Sanjay Gaikwad Over Threat Remark, Demands Action
Shahu Maharaj administration historical documents
116-Year-Old Legacy Revived as Renovation Work Starts on Shivaji Takht
Officials during the Maratha reservation subcommittee meeting discussing cases against protesters.
Marathi News Esakal
www.esakal.com