जत : जत तालुक्यातील डफळापूर, जिरग्याळ, एकुंडी, खिलारवाडी गावच्या परिसरातील ११ द्राक्ष बागायतदारांना द्राक्षमालास दुप्पट किंमत देतो, असे सांगून ७२ लाख १४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात तिघा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद कुमार सुखदेव कोरे (रा. जिरग्याळ) यांनी जत पोलिसांत दिली आहे.