

Rising Grape Farming
sakal
सांगली : गेल्या २५ वर्षांत द्राक्षाच्या विक्री दरात सरासरी दीडपट वाढ झाली असली, तरी त्याच कालावधीत उत्पादन खर्चात तब्बल आठपट वाढ झाली आहे. मजुरी दरातील प्रचंड वाढीने द्राक्ष शेतीचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले आहे. मजुरीतील वाढ जवळपास ५० पट असून, विद्राव्य खते, कीटकनाशके व टॉनिकच्या दरात सहापट वाढ झाली आहे.