Sangli Grapes : तापमानाचा फटका द्राक्ष घडांना; ‘सन बर्निंग’मुळे उत्पादन व गुणवत्ता धोक्यात
Sun Burning Problem in Grap : अचानक ऊन-थंडीमुळे द्राक्ष मण्यांवर भाजल्यासारखी लक्षणे दिसून उत्पादन घटते. प्रत्येक घड सावलीत राहील अशी पानांची रचना केल्यास सन बर्निंगचा धोका कमी होतो.
सांगली : तापमानातील चढ-उतारामुळे द्राक्ष बागांतील घडांवर सन बर्निंगची समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यंदा ५० टक्के क्षेत्रावरील बागांना घड पडले नाहीत. सध्या पडलेले घड संख्याही उताळ-पाताळ आहे.