esakal | 'सीमाप्रश्नासाठी शेवट पर्यंत लढा ; होतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत'
sakal

बोलून बातमी शोधा

greetings to the martyrs of kannada forced movement in belgaum

1 जुन 1986 च्या कन्नडसक्ती आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले..

'सीमाप्रश्नासाठी शेवट पर्यंत लढा ; होतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : सीमावाशियांचा लढा हा मातृभाषेसाठी असून 1956 पासून मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय सुरू असून ज्यांनी सीमाप्रश्नासाठी रक्त सांडले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहूया असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. 


1 जुन 1986 च्या कन्नडसक्ती आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना सोमवारी अभिवादन करण्यात आले.. प्रारंभी अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार अरविंद पाटील आदिंनी पुष्पगुच्छ अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.

हेही वाचा- साडेपाच हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी -

कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन ​,

यावेळी बोलताना दळवी यांनी अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत आज सर्वजण हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो  आहोत अनेक वर्षे झाली तरी मातृभाषेसाठी आपल्या मनातील भावना तेवत ठेवल्या आहेत कन्नड सक्ती आंदोलनात इथल्या युवकांनी आंदोलन हाती घेतले आणी होतात्म्य पत्करले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वकिलांची बैठक घेतली आहे तसेच हरिष साळवे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच न्यायालयीन प्रक्रियेला सुरवात होईल असे मत व्यक्त केले. 


माजी आमदार पाटील, किणेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पावसाची संततधार सुरू असून देखील मराठी भाषिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर , भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदि घोषणा देण्यात आल्या जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, चेतक कांबळे, शिवाजी राक्षे, संशोष मंडलिक, माजी नगरसेवक नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, राकेश पलंगे, विनायक गुंजटकर, युवा समितीचे शुभम शेळके, धनंजय पाटील, श्रीकांत कदम, रामचंद्र कुद्रेमाणिकर, सूर्याजी पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, पी एच पाटील, पुंडलिक कारलगेकर, दत्ता उघाडे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, आर के पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.