esakal | सोलापूरातील गड्डा यात्रेला पालकमंत्री अनुपस्थित
sakal

बोलून बातमी शोधा

-

सोलापूरातील गड्डा यात्रेला पालकमंत्री अनुपस्थित

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : सोलापूरातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर यात्रेला (गड्डा) पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची गैरहजेरी होती. लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेसाठी आले आहेत. ऐवढी मोठी यात्रा असताना पालकमंत्री कसे काय आले नाहीत, अशी चर्चा त्यानिमित्ताने रंगली आहे. 


सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वराची गड्डा यात्रा सर्वधर्म समभावचे प्रतिक मानली जाते. या यात्रेत मंगळवारी अक्षता सोहळा झाला. सोलापूरसह कर्नाटकमधील लाखोंच्या संख्येने भाविक यावेळी उपस्थित होते. साडेबाराच्या दरम्यान सातही नंदीध्वज मंदिर परिसरातील संमतीकट्टावर आल्यानंतर अक्षता सोहळा झाला. यावेळी यात्रा कमीटी व मंदिर समितीचे प्रमुख मानकरी, प्रमुखव्यक्ती उपस्थित होत्या. धार्मिक विधीचे कार्यक्रम झाल्यानंतर अक्षता सोहळा झाला. माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, धर्मराज काडादी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यासह महापालिकेतील प्रमुख नेते व राजकीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पांढरी शुभ्र बाराबंदी परिधान केलेले भक्त उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधी सोमवारपासून सुरु झाले आहेत. सोमवारी ६८ लिंगांना तैलाभिषक झाला. त्यानंतर मंगळवारी अक्षता सोहळा झाला. यात्रेतील या सोहळ्याला पालकमंत्री वळसे पाटील उपस्थित राहतील अशी आशा सर्व भाविकांना होती. मात्र, अक्षता सोहळ्यार्पंत ते उपस्थित राहिले नाहीत. 


महाराष्ट्रात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. या सरकारच्या मंत्रीमंडळात सोलापूरला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे यावेळी सोलापूरला बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. जिल्ह्यातील प्रणिती शिंदे, भारत भालके किंवा बबनराव शिंदे यांच्यापैकी कोणाला तरी मंत्रीपद मिळेल अशी शक्यत होती. मात्र, जिल्ह्यातील कोणालही मंत्रीपद मिळाले नाही. 

loading image