कोनवडे : गव्याच्या हल्यात शेतकरी जखमी |guava Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guava

कोनवडे : गव्याच्या हल्यात शेतकरी जखमी

कोनवडे : गिरगाव (ता. भुदरगड) येथे जनावरांसाठी गवत आनण्यासाठी गेलेल्या येथील सुभाष दत्तात्रय देसाई (वय ४२) या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला (Farmers Attacked by wild Animal) केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. खासगी परिसरात गवे दाखल होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

जखमी श्री. देसाई आज रविवार (ता. २६) रोजी सकाळी आपल्या गिरगाव येथील गट ८४ मध्ये कुरव नावाच्या शेतात जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते सकाळी सव्वानऊच्या सुमारास गव्याने समोरून येऊन शेतकऱ्यावर हल्ला करून त्यास जखमी केले. सदर जखमी शेतकरी सुभाष देसाई यांना वैद्यकिय उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण ते गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये हलवले.

हेही वाचा: Mumbai Traffic Updates : ट्रॅफिक जामने केला मुंबईकरांचा मूड ऑफ, मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गवे मानवी वस्तीमध्ये येण्याच्या घटना वारंवार घडत असूनही वन विभाग झोपेचे सोंग घेत आहे. वन विभागाचे कर्मचारी परिसरात फिरकत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात तरी वन विभाग उपाययोजना करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात तिसरी घटना घडूनही वन विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल किशोर आहिर, वनपाल मारूती डवरी व वनसेवक बजरंग शिंदे यांना घेवून घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. शेतकऱ्यास शासकिय मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Guava Attack Farmer Konavade Paschim Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Farmerbelgaum
go to top