
शिराळा : शिराळा, कऱ्हाड, पाटण या सांगली, सातारा जिल्ह्यांतील तीन तालुक्यांतील १०५ गावांसाठी गुढे-पाचगणी व येवती या उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून १ कोटी ६५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बुधवारी (ता. २८) खुंदलापूर येथून योजनेची स्थळपाहणी करण्याचा निर्णय कोल्हापूर सिंचन भवन येथे डॉ. भारत पाटणकर, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.