Gulbarga Loksabha Election : कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची ताकद पणाला

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लोकसभेची निवडणूक लढवत आहे.
Gulbarga Loksabha Election 2024
Gulbarga Loksabha Election 2024sakal

काँग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी, खरी कसोटी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आहे. काँग्रेसची धुरा सांभाळताना जावयाला खर्गे यांना विजयी करायचे आहे. गुलबर्ग्याचे विद्यमान खासदार उमेश जाधव यांच्याविरोधात काँग्रेसने खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोडमनी यांना उमेदवारी दिली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लोकसभेची निवडणूक लढवत आहे. कर्नाटकात सध्या काँग्रेस सत्तेवर आहे. सर्वाधिक खासदार कर्नाटकमधून निवडून आणण्याचे आव्हान खर्गे यांना पेलावे लागणार आहे. गुलबर्गा मतदारसंघ पूर्वी खर्गे यांचाच मतदार संघ होता.

२००९ व‌ २०१४ लोकसभा निवडणूक गुलबर्गा मतदारसंघातून लढवत ते विजयी ठरले. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा बदला घेण्यासह जावयाला या ठिकाणी विजयी करण्याचे आव्हान खर्गे यांच्यासमोर आहे. त्यामुळे खर्गे यांची ताकद खऱ्या अर्थाने येथे पणाला लागली आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच ओळख असलेल्या गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात दोन पोटनिवडणुकांसह १९ लोकसभा निवडणुकीत १६ वेळा काँग्रेसने विजय मिळविला आहे. एकदा जनता दलाने येथे बाजी मारली असून, १९९८ मध्ये विजयी ठरलेला भाजप नंतर चार वेळा पराभूत होत पुन्हा २०१९ मध्ये विजयी ठरला.

२०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवार उमेश जाधव यांनी काँग्रेस उमेदवार खर्गे यांचा तब्बल ९५,४५२ मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसने खर्गे यांना राज्यसभेवर निवडून पाठवून दिले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा हा मतदारसंघ असल्याने इतर काँग्रेस नेत्यांनी बरीच काळजी घेतली आहे.

गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात अफजलपूर, जेवरगी, गुरुमितकल, चित्तापूर, सेडम, गुलबर्गा ग्रामीण, उत्तर आणि दक्षिण असे आठ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी केवळ एक मतदार संघ भाजपच्या पारड्यात असून दुसरा धजदकडे आहे. उर्वरित सहा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस या ठिकाणी वरचढ आहे.

धजदने भाजपसोबत युती केल्याने धजदचे आमदार नागणगौडा कंदकुर भाजप उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. मोदी फॅक्टर, बंजारा समाजाचा पाठिंबा, या भागातील पाच वर्षांत केलेल्या विविध विकास योजना भाजप उमेदवार जाधव यांच्या पथ्यावर पडणार आहेत. पण ग्रामीण भागात खासदार म्हणून ते फिरकलेच नसल्याने नाराजीही आहे.

तर काँग्रेस उमेदवार दोडमनी हे खर्गे यांचे जावई असून, राज्याच्या हमी योजना, सहा आमदारांचे बळ त्यांच्या पाठीशी आहे. दोडमनी यांनी आजपर्यंत कोणतीच निवडणूक लढलेली नसून त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. यापूर्वी दोडमनी यांनी राजकारणात खर्गे यांना केवळ मदत केली आहे.

यंदा प्रथमच ते थेट निवडणुकीला सामोरे जात असल्याने राजकारणात ते सक्रिय होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी दोडमणी यांचा जरी विजय झाला तरी, मतदारसंघाची सूत्रे मात्र खर्गे यांच्याच हाती असणार आहेत. काँग्रेसला कर्नाटकतूनच अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. सध्या खर्गे गुलबर्गा मतदार संघाकडे विशेष लक्ष देऊन आहेत.

२०१९ चा निकाल (मिळालेली मते)

  • उमेश जाधव (भाजप) - ६,२०,१९२ - ५२.१४ टक्के

  • मल्लिकार्जुन खर्गे (काँग्रेस) - ५,२४,७४० - ४४.१२ टक्के

मतदारसंख्या

  • पुरुष मतदार - १०,३४,२५७

  • महिला मतदार - १०,३१,०५७

  • तृतीयपंथी - २१३

  • एकूण - २०,३५,८०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com